सांगली प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पावनदिनी लोकशिक्षण मंडळ, सांगली संचलित *देशभक्त नाथाजी लाड विद्यालय, विश्रामबाग* येथे पारंपरिक वारीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन होऊन भक्तीरसात न्हाऊन निघाले.
शाळेपासून निघालेल्या भक्तीदिंडीचा शुभारंभ मुख्याध्यापक *सचिन लाड* आणि नवशिक्षण मंदिरचे मुख्याध्यापक *दत्तात्रय भोसले* यांच्या हस्ते पालखी पूजन करून करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सचिन लाड म्हणाले, _"वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर ती माणुसकी शिकवणारी जीवनशाळा आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी."_
दत्तात्रय भोसले यांनी मनोगतात सांगितले की, _"पंढरीची वारी म्हणजे भक्ती आणि नियोजनाचा अद्भुत संगम आहे. जगभरातील लोक या शिस्तबद्ध परंपरेचे कौतुक करतात."_
दिंडीने शाळेपासून परिसरातील विविध मंदिरांना भेटी दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग, भक्तीगीते आणि टाळ-मृदुंगाच्या ठेक्याने परिसर भक्तिमय झाला होता.
या उत्सवात संस्थेचे संचालक, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते. लहानग्यांच्या डोक्यावरील टोपी, गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील पताका यामुळे शाळेचा परिसर खऱ्या वारीसारखा भासत होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या