सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेच्या वतीने सांगली विभागातील एसटी कामगारांचा जिल्हा मेळावा शुक्रवार, दिनांक ३१ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आटपाडी आगाराच्या गेटजवळील गणेश मंदिरात सकाळी ११ ते २ या वेळेत होणार असल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.
अशोक खोत म्हणाले की, या मेळाव्यात एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मेळाव्यात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे हे कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आटपाडी आगारातील ज्येष्ठ कर्मचारी प्रवीण देशमुख यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार व त्यांच्या कार्याचा गौरव समारंभ होणार आहे. यासह दुपारी दोन वाजता संघटनेच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची केंद्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. यावेळी संघटनेच्या आगामी वाटचाली संदर्भात दिशा ठरवली जाणार आहे. या मेळाव्यास सर्व एसटी कामगार व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक खोत व विभागीय सचिव जयदीप पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या