सांगली : सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव तथा बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ 26 वा जिल्हा कबड्डी दिन आझाद व्यायाम मंडळ सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडू, प्रशिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आष्ट नगर परिषदचे नगराध्यक्ष विशाल शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, राज्य असोसिएशन पंच मंडळ अध्यक्ष विश्वास मोरे, सहा. आयुक्त माणिक गोंधळे , न्यूरो सर्जन डॉ. रोहन पाटील, माजी नगर सेविका आशाताई शिंदे, हरिदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके , कार्याध्यक्ष माजी आमदार दिनकर तात्या पाटील , नगराध्यक्ष विशाल शिंदे, वैभव शिंदे, विश्वास मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यवाह नितीन काका शिंदे , आभार माजी नगरसेवक सागर घोडके तर सूत्रसंचालन डॉ. सुहास व्हटकर यांनी केले. राज्य कबड्डी असोसिएशनचा कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव तथा बुवा साळवी जीवन गौरव पुरस्कार 2026 माजी आमदार दिनकर तात्या पाटील , ज्येष्ठ पंच पुरस्कार मधुकर साळुंखे, ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार मनोहर जाधव तसेच राज्य असोसिएशनची रु. 5000/= शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल सानिका सिद्राम पाटील तसेच सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ खेळाडू म्हणुन अंजेला आपटे व अशोक चोपडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाले बद्दल प्रशांत कोरे, धनाजी शिद , आलम मुजावर , राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाले बद्दल सानिका सचिन पाटील, आदित्य येसुगडे ,आदर्श शेळके, शर्वरी पाटील, भक्ती महाडिक, श्रावणी भोसले, उत्कर्षां यादव या खेळाडूंचा व प्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा.अजित शेळके, प्रा. वैभव पाटील, प्रा. अभिषेक पाटील, महेश घोडके, आकाश तिवडे ,अधिक पाटील ,आदिनाथ गायकवाड, संकल्प करवते , सुहास वगरे ,विलास गायकवाड , उमेश वाईगडे , नितीन चौगुले या प्रशिक्षकांचा तसेच राज्य स्पर्धेत विजयी झालेल्या सांगली जिल्हा संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष अजित भोसले, शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या माणिक परांजपे, माजी राष्ट्रीय खेळाडू कुमुद कागलकर ,अरुणा जाधव, अरुणा घोलबा , राजश्री केळकर, वर्षा भोसले, सरिता दळवी या महिला खेळाडू बरोबर जिल्ह्यातील उल्हास नायक, सतीश पवार, राजू माळी, प्रकाश कांबळे, अमोल भिलवडिकर , शाम फडतरे व आजी - माजी खेळाडू यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सांगलीत 26 वा जिल्हा कबड्डी दिन उत्साहात संपन्न
By -
जुलै २९, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या