सांगली, दि. २९ : सांगली ग्रामीण पोलिसांनी जुनी धामणी (ता. मिरज) येथील शासकीय सांडपाणी व्यवस्थापन योजनेवरील साहित्य चोरी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २१५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी प्रांजल संजय पाटणकर (रा. मंञी कॉलनी, उरण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात अक्षय अनिल कोळी (वय ३०) व अनिल मारुती कोळी (वय ४३, दोघे रा. ग्रामपंचायतीजवळ, जुनी धामणी, ता. मिरज) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीची टीव्हीएस एक्सएल डिलक्स दुचाकी, १० हजार रुपये किमतीचा बलवान कंपनीचा पाणी उपसा पंप, ४ हजार रुपये किमतीचे दोन फोल्डिंग पाईप आणि १ हजार रुपये किमतीचे लोखंडी सळईचे बंडल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस अंमलदार मेघराज रुपनर, अरुण ओताडे, बंडू पवार, अभिजित पाटील आणि शेखर पवार यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. अभिजित पाटील करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या