सांगली प्रतिनिधी : नागपूरचे महाराज मुधोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे शिवभक्तांचे NCERT च्या विरोधात आंदोलन झाले.यावेळी नागपूरचे महाराज मुधोजीराजे भोसले ,मासाहेब जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव ,रविन्द्रभाऊ पडवळ, कुणालजी मालुसरे, नानासाहेब जावळे,म्हाळुंगेचे सुरेंद्र इंगळे सरकार, प्राध्यापक नामदेवराव जाधव,
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे मुंबई विभाग प्रमुख राम माने उपस्थित होते. यावेळी वरील सर्व संघटना प्रमुखांचे मार्गदर्शन पर भाषण झाले. यावेळी सर्वांनी NCERT ने पुन्हा 8 वी च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करावा अन्यथा आज मुंबई मध्ये आंदोलन करीत आहोत पुढील आंदोलन दिल्ली येथील जंतर मंतर येथे हजारोंच्या संख्येने करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्री यांचे बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण घेऊन शिक्षणमंत्री पंकज जी भोईर हे आंदोलन स्थळी उपस्थित राहिले.
यानंतर मंत्रालय येथे मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत या विषयावर बैठक पार पाडली त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या नकाशा संदर्भात
सर्व ऐतिहासिक पुराव्यांसहित मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन देण्यात आले. याबाबतीत केंद्र सरकारशी पत्र व्यवहार झालेला असून याचा पाठपुरावा करून लवकरच आपला मराठा साम्राज्याचा नकाशा 8 वी च्या पुस्तकामध्ये सहभागी होईल असे आश्वासन मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले.
त्याचबरोबर यावर्षी शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये छ.शिवाजी महाराजांचा 26 पानी इतिहास नव्याने समाविष्ट करून घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छ भेट घेतली व यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्व युवा सहकारी व शिवभक्त उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या