सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त आश्विनी पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक ८ मधील विविध विकासकामांची व परिसराची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामे तसेच डी.पी. रोडची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई प्रभावीपणे पूर्ण करावी, परिसरात वृक्षारोपण करावे आणि स्वच्छता कायम राखावी, अशा सूचना दिल्या. तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची पाहणी करून परिसराच्या देखभालीबाबत समाधान व्यक्त केले.
पाहणीदरम्यान उपायुक्त पाटील यांनी स्मारक परिसरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणीवेळी नगरसेवक विष्णु माने , एस.आय. सिद्धार्थ ठोकळे, एस.आय. कांबळे, उत्कर्षा कसबेकर, इंजिनिअर तात्यासाहेब खोत (बिल्डर) तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या