प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल, विजयनगर येथे सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना मार्फत, सचिव चंद्रकांत वळवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केपीज चेस अकॅडेमी यांच्या विशेष सहकार्यातून बुद्धिबळ निवड स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून मुले आणि मुलीनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू होते.
सदर स्पर्धा स्विस लीग या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत पद्धतीने पार पडली.
*17 वर्षाखालील मुले*
प्रथम - आदित्य चव्हाण
द्वितीय - कश्यप खाखरिया
*17 वर्षाखालील मुली* :-
श्रेया हीप्परगी.
ईश्वरी जगदाळे.
वरील सर्व खेळाडूंची 17 वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुंबई इथे 26, 27, 28 जून रोजी होणाऱ्या राज्य स्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
सदर स्पर्धेची चषक केपीज चेस अकॅडेमी तर्फे पुरस्कृत केली होती. तर तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलने स्पर्धेचा हॉल उपलब्ध करून दिला होता.
स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम श्री विजयानंद शिंदे सर माजी मुख्याध्यापक, शांतीनिकेतन स्कूल, सांगली यांच्या हस्ते तसेच चंद्रकांत वळवडे, सचिव सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटना सांगली, पोर्णिमा उपळावीकर आंतरराष्टीय पंच, अमेय पाटील क्रीडा आणि योग शिक्षक, तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल, यांच्या उपस्तिथीत संपन्न झाला.
या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे केपीज चेस अकॅडमीच्या संचालिका, आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. तसेच इतर पंच म्हणून अमेय पाटील, चंद्रकांत वळवडे यांनी अतिशय उत्तमरीत्या काम पार पाडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या