ईश्वरपूर, प्रतिनिधी : शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती कामेरी यांच्या शिष्टमंडळाने आज ईश्वरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर अन्यायकारकपणे लादण्यात आलेला व गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
*शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती कामेरीच्या वतीने सरपंच रणजित पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन ना. रामदासजी आठवले साहेब यांचे स्वागत केले.* शक्तिपीठ महामार्गामुळे परिसरातील दलित, मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचे निवेदनाद्वारे मांडले. तसेच या महामार्गामुळे दलित मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकरी पुर्णता भूमीहीन होणार असून शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचे सांगितले.
यावर केंद्रीय राज्यमंत्री *ना. रामदास आठवले यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत, “लवकरच मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भेटीची वेळ निश्चित करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणली जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे म्हटले आहे.*
या भेटीप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे *जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा सचिव सचिन जाधव, तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, सुधीर पाटील, शहाजी पाटील, संतोष माळी, प्रकाश कदम, आरीफ मुल्ला, संजय पाटील, विजय पाटील, जगोद्धर पाटील, सुशील सावंत, प्रविण कांबळे, दिनेश जाधव, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे पिराजी थोरवडे, पत्रकार रामचंद्र कुंभार* आदींसह शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती कामेरी गावचे शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या