जीवनसाथीच्या शोधात फसवणूक होणे ही सध्या एक गंभीर समस्या बनली आहे.मॅट्रिमोनियल साइट्स आणि डेटिंग ॲप्सवर बनावट प्रोफाइलद्वारे कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वेगाने वाढत आहेत.
जीवनसाथीच्या शोधासाठी वापरल्या जाणाऱ्या मॅट्रिमोनियल (विवाह) संकेतस्थळांवर सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले. आहेत. फसवणूक करणारे बनावट प्रोफाईल बनवून भावनिक जाळ्यात ओढतात आणि नंतर महागड्या भेटवस्तू किंवा गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करतात.बनावट प्रोफाईल तयार करून लोकांच्या भावनांशी खेळणे आणि पैशांची लूट करणे हा प्रकार सर्रास घडत आहे.
फसवणूक करणारे बनावट प्रोफाईल तयार करून भोळ्या-भाबड्या लोकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर पैशांची मागणी करतात.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या एका घटस्फोटीत महिलेची तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिलेने छाती डॉट कॉम या विवाह विषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती सन २०१८ मध्ये आरोपीने स्वतःचे नाव अजय सिंग संतोष सिंग अग्रवाल आणि व्यवसाय बिल्डरशिप असल्याचे सांगून पीडीतेशी संपर्क साधला विश्वास संपादन करून त्याने कोर्ट मॅरेजचे आमिष दाखवले आणि पीडितेचे पॅनकार्ड व मॅरेज फॉर्म वर साक्षरी घेऊन तिला मोबाईलवर एका बनावट मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो पाठवला व आपले दोघांचे लग्न झाल्याचे बनाव केला. लग्नाचा बनाव केल्यानंतर आपला तीन कोटींचा प्रोजेक्ट अडकल्याचे सांगत आरोपीने पैशाची मागणी केली तो स्वतः अमरावतीत आला आणि विहिरीतेकडून दोन लाख रुपये घेऊन गेला त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी त्याने एकूण २५ लाख ९० हजार रुपये उकडले. दरम्यान एका व्हिडिओ कॉल दरम्यान आरोपी सोबत दुसरी महिला दिसल्याने पिढीतील संशयाला तिने थेट मुंबई गाठून चौकशी केली असता आरोपी विवाहित असल्याचे आणि मॅरेज सर्टिफिकेट बनावट असल्याचे उघड झाले या प्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी पुन्हा दाखल करून मनोज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी सीतापुर उत्तर प्रदेश या , भामट्याला अटक केली.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये देखील अशीच घटना घडली.
शादी डॉट कॉम वेबसाईटवरून मुलीशी संपर्क साधून लग्नाचं अमिष दाखवून महिलेची ३ करोड १६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रणजीत मुन्नालाल यादव, सिकंदर मुन्ना खान आणि बबलू रघुवीर यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणूक झालेल्या महिलेकडून ८१ बँक खात्यावर पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे.
फसवणूक करणारे भामटे
परदेशात (उदा. अमेरिका, कॅनडा) किंवा लष्करात चांगल्या नोकरीवर असल्याचे भासवून महागड्या भेटवस्तू व्हिसा फी किंवा वैद्यकीय इमर्जन्सीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. सुरुवातीला जवळीक साधून वैयक्तिक माहिती काढली जाते आणि नंतर ती उघडकीस आणण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जाते.बनावट मॅट्रिमोनिअल वेबसाईट किंवा कस्टमर केअर प्रतिनिधी बनून नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे लुटले जातात.
हे धोके टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.अनोळखी व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत पैशांची मदत करू नये किंवा बँक खात्याचा तपशील शेअर करू नये स्वतः पडताळणी करावी केवळ वेबसाईटवरील माहितीवर विश्वास न ठेवता, त्या व्यक्तीच्या कामाची जागा, कुटुंब आणि सोशल मीडिया प्रोफाईलची खात्री करून घ्यावी.जर समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा लगेच लग्न करण्याची घाई करत असेल, तर सावध व्हावे. नोंदणी करताना नेहमी सुरक्षित आणि अधिकृत सरकारी सायबर पोर्टल द्वारे प्रमाणित केलेल्या वधू-वर सूचक वेबसाईटचा वापर करावा.
९५६१५८४३०६
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या