प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:23 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर निमणी येथे 'विधवा' या शब्दाऐवजी 'एकल महिला' असा सन्मानपूर्वक शब्दप्रयोग करून एकल महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमातून महिलांच्या सन्मान,हक्क आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.गावातील श्री हनुमान मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.रेखा रविंद्र पाटील आणि उपस्थित एकल महिलांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सौ.रेखा पाटील यांनी शासनाच्या या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की,एकल महिलांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.कार्यक्रमात उपस्थित एकल महिलांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या.तसेच बचत गटामध्ये समावेश नसलेल्या महिलांना स्वयं-सहाय्यता बचत गटाशी जोडण्यासाठी विशेष चर्चा करण्यात आली.महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवरही यावेळी विचारमंथन करण्यात आले.या कार्यक्रमाला निमणीचे माजी उपसरपंच आर.डी.पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव जमदाडे, उदय पाटील,मुनेश्वर मस्के,बबन सोमदे,अंगणवाडी सेविका शारदा गायकवाड,जयश्री सूर्यवंशी, उमेदच्या अक्षता कांबळे,सुषमा वसुदेव,आशा स्वयंसेविका सुरेखा देवकुळे, संगिता केरिपाळे, आशाराणी सावंत तसेच श्रीमती सुरेखा पाटील,सुमन सुखदेव, सावित्री माने,सुमन पाटील,विजया गायकवाड,वंदना जमदाडे,मिनाक्षी राजमाने,जुलेखा मुलाणी,शशिकला घोडके,सविता सुखदेव,शेवंता सुखदेव,सुवर्णा सुखदेव,महादेवी पाटील,खुदीजा मुलाणी,आक्काताई राजमाने,कल्पना राजमाने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.या उपक्रमामुळे एकल महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली असून,त्यांच्या सन्मान आणि हक्कांबाबत समाजामध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या