प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : भारतीय जनसंघाचे संस्थापक व महान राष्ट्रचिंतक श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मिरज येथे अभिवादन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य आणि भारतीय जनसंघाच्या स्थापनेमागील त्यांची दूरदृष्टी यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गणेश माळी, मोहन वाटवे, वैभव नलवडे, बाबासाहेब आळतेकर, आप्पा पाटील , जितेंद्र खाडे, गजानन चौगुले, सुनील कुलकर्णी, वैभव यमगर, धनंजय कुलकर्णी, अनिता हारगे, सारिका राहूटे, ज्योती मगदूम, अनिता साळुंखे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली. उपस्थितांनी डॉ. मुखर्जी यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या