प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरातील भिलवडी नाका ते विटा रोड बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.शासनाने जमीन ताब्यात घेतल्यानंतरही मोबदला मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांची तातडीने नुकसानभरपाई अदा करावी,२०२३ मधील ८५ कोटी रुपयांचा तसेच २०२५-२६ मधील १४.२७ कोटी रुपयांचा मंजूर निधी लाभार्थ्यांना वितरित करावा, सातबारावरील संपादनाच्या शेरामुळे निर्माण झालेल्या कर्जविषयक अडचणी दूर कराव्यात आणि नुकसानभरपाईच्या रकमेवर १२ टक्के व्याज द्यावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.बायपाससाठी संपादित ३१ गटांपैकी केवळ दोन गटांनाच नुकसानभरपाई मिळाली असून उर्वरित ११ गटांतील शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत.वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या