प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजर्षी छत्रपती शाहू राजे हायस्कूल, सुभाषनगर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू राजेंची 152 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे सेक्रेटरी ॲड. संदीप मालगावकर साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूराजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन करण्यात आले .
जयंतीच्या निमित्ताने हायस्कूल मधील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या निबंध स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर " राजर्षी छत्रपती शाहू राजांचे जीवनकार्य " या विषयावर लहान व मोठ्या गटात वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. लहान गटात प्रथम क्रमांक केदार प्रसाद गवळी , द्वितीय क्रमांक भाग्येश मष्णू गावडा, तृतीय क्रमांक कु.भक्ती सोमनाथ ढोणे तर उत्तेजणार्थ कु.श्रेया सुधीर धेंडे तर मोठ्या गटात कु. सायली मच्छिंद्र मोटे हिने प्रथम क्रमांक, हर्षद चंद्राप्पा पुजारी याने द्वितीय तर नारायण मष्णू गावडा यांने तृतीय तर कु. नंदिनी सोनवणे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. धनश्री मालगावकर, सौ विद्या कांबळे,सौ.पल्लवी कांबळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री . डी. एस.माळी , तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या