प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित, राजर्षी छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय, सांगली(ता.मिरज), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्चना शिंदे, प्राध्यापक अबोली पिंजरकर, प्राध्यापक प्रीती जंगम NSS अधिकारी किशोर चंदुरे , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षीच्या जयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे 'मोबाईलमुक्त वाचन उपक्रम'. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान मोबाईलचा वापर न करता राजर्षी शाहू महाराजांचे विचार, चरित्र तसेच सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याण यावरील पुस्तके वाचून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली. या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक न्याय, समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून ज्ञान, वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत वाचन संस्कृती रुजविण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या