सांगली, दि. २६ : समरसता साहित्य परिषद, सांगली जिल्हा यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शाळा क्रमांक ४ येथे महापुरुष पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कवयित्री व साहित्यिक सौ. अस्मिता इनामदार यांनी “छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता देवके, सहाय्यक शिक्षिका सौ. धनश्री यादव, सौ. पाटील तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करून सामाजिक समतेचा संदेश आत्मसात करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे आयोजन समरसता साहित्य परिषद, सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिषदेचे अध्यक्ष श्री. विनायक कुलकर्णी, कार्यवाह श्री. आनंदराव जाधव तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष श्री. विनायक कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या