सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील बिसूर या गावांमधील मशिदीमध्ये बाहेरून परराज्यातून जमातिचे 20-20 लोक येतात ते मुस्लिम लोक मशिदीच्या शेजारी राहणाऱ्या हिंदू कुटुंबियांना त्रास देत आहेत. शेख, नदाफ, सय्यद तसेच बाहेरील राज्यातून आलेले हाफिज मशिदीमध्ये जोरात बोलणे, मोबाईलवर जोरात गाणी वाजवणे, हिंदू महिलांकडे बघुन अश्लील हावभाव करणे, हिंदू धर्माबद्दल वाईट बोलणे असे प्रकार चालू आहेत तरी हिंदू लोकांनी त्यांना विरोध केल्यावर तुमची दारे, खिडक्या बंद करून घ्या अशी धमकी देत आहेत. तरी सदर हिंदू कुटुंबीयांनी गावातील नेतेमंडळी व प्रतिष्ठित लोकांना सांगून सुद्धा हे प्रकार बंद झाले नाहीत. म्हणून तेथील दहा १० हिंदू कुटुंबीय सदरच्या मशिदीतील मुस्लिम लोकांना वैतागून बिसूर गाव सोडण्याच्या तयारीत आहेत.
तरी बिसूर गावा मधील मशिदीमध्ये बाहेरील जिल्ह्यातुन व राज्यातुन जमातीचे लोक येतात ते कोण आहे त्यांची चौकशी करावी त्यांच्या मुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हिंदू कुटुंबियांना त्रास देणाऱ्या लोकांच्यावर जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून कायदेशीर कारवाई करून हिंदू कुटुंबियांना संरक्षण देऊन त्यांना गाव सोडण्यापासून रोखावे. अन्यथा त्या मुस्लिम जमातीचा बंदोबस्त हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी करतील. असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आम्ही देत आहोत.
हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, दत्तात्रय भोकरे, शहराध्यक्ष अनिरुध्द कुंभार, पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, सोमनाथ गोटखिंडे, प्रसाद रिसवडे, भूषण गुरव, दिग्विजय शिंदे, गजानन माने, हरपितसिंग गौड, सुमित शिंगे, अनिकेत आंबरुळे, अवधूत जाधव, राजू जाधव, राम काळे, अक्षय पवार, कृष्णा नायडू.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या