सांगली :अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समिती, भावे नाट्य मंदिर यांच्या वतीने "दिनकर पुरोहिताचा खून" हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. बुधवारी ,दि-6 मे 2026 रोजी रात्री -8 .00वाजता विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे हा प्रयोग रंगणार आहे. विशेष म्हणजे या नाटकाचा प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
चं. प्र. देशपांडे यांनी नाटकाचे लेखन केले आहे. डॉ. दयानंद नाईक यांनी दिग्दर्शन केले आहे. निर्मिती डॉ. शरद कराळे यांनी केली आहे.
नाटकात गोविंद बर्वे, कल्याणी खाडिलकर, विवेक देशपांडे, नंदिनी देशपांडे, धनंजय खाडिलकर, सचिन कुलकर्णी या कलाकारांचा सहभाग असेल.
रहस्य, उत्कंठा आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले हे नाटक रसिकांसाठी एक खास मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे सांगलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या