पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या देदीप्यमान यशामुळे देशभर आनंदाचे वातावरण आहे. या विजयाचे पडसाद सांगलीतही उमटले असून, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करत जोरदार जल्लोष साजरा केला.
यावेळी 'भारत माता की जय', 'नरेंद्र मोदी झिंदाबाद' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आणि गुलाल उधळून विजयाचा आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना.
आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, "हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आणि केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या लोककल्याणकारी कामांवर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर भाजपने जनतेची मने जिंकली आहेत. आगामी काळातही पक्ष अधिक जोमाने सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहील."
या विजयोत्सवाप्रसंगी भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, अजिंक्य वुमन्स फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. मंजिरीताई गाडगीळ, सांगली महापालिका स्थायी समिती सभापती अतुल माने, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, समाज कल्याण सभापती गीताताई पवार, नगरसेविका योगिताताई राठोड, वर्षाताई सरगर, मीनाक्षीताई पाटील, नगरसेवक उदय बेलवलकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस स्मिताताई भाटकर, मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, कृष्णा राठोड, भूपाल सरगर, मकरंद म्हामुलकर, रिद्धीताई पटेल-म्हामुलकर, विद्याताई दानोळे, सुरज पवार, किरण कपाले, निलेश निकम, सुनील जाधव, शैलाजाताई कोळी, गणपत साळुंखे, सदाशिव पाटील, सुनिताताई पाटणकर, स्नेहजाताई जगताप आदी पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या