प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा वरिष्ठ गट (सिनियर) मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १० व ११ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, कृष्णामाई हॉस्पिटलसमोर, मिरज रोड, सांगली येथे होणार आहे.
ही स्पर्धा पुरुष व महिला या दोन्ही गटांसाठी खुली असून, यामधून राज्यस्तरीय वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख दि. ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहे.
खेळाडूंनी आपली नोंदणी सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ व संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत करावी.
निवड समितीत मिलिंद खिलारे, उत्तम मोरे, मिलिंद कुलकर्णी व युवराज खटके यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी सचिव संजय पाटील (मो. ९७६७५९५०५९) तसेच डॉ. गणेश शिंगसणे (मो. ७३८५३५२६२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या