प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा विजयनगर येथील तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या गटात आदित्य चव्हाण याने जिल्हा विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या गटात श्रेया हिप्परगी हिने बाजी मारत जिल्हा विजेती ठरली.
संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केपीज चेस अकॅडेमीच्या विशेष सहकार्याने स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून 25 मुले व 13 मुलींनी सहभाग नोंदवला. यामध्ये 16 मुले व 7 मुली आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू असल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली.
मुलांचा निकाल :
प्रथम – आदित्य चव्हाण
द्वितीय – विक्रमदित्य चव्हाण
तृतीय – अद्विक फडके
चतुर्थ – शर्विल येडेकर
मुलींचा निकाल :
प्रथम – श्रेया हिप्परगी
द्वितीय – ईश्वरी जगदाळे
तृतीय – सारा हारोले
चतुर्थ – स्वरा बावडेकर
पंचम – सृष्टी चिंचणे
षष्ठ – माधवी देशपांडे
सप्तम – मृण्मयी गोसावी
स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय निवड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, ते दि. 15, 16 व 17 मे रोजी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेतील रोख पारितोषिके व चषक केपीज चेस अकॅडेमीतर्फे देण्यात आले, तर तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलने स्पर्धेसाठी हॉल उपलब्ध करून दिला. स्पर्धेचे उद्घाटन चेअरमन धनंजय वाघ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ पायल खाखरिया, भाग्यश्री हारोले, मकरंद गोसावी, मंगेश लव्हाळे, चंद्रकांत वळवडे व पोर्णिमा उपळावीकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेच्या मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच व केपीज चेस अकॅडेमीच्या संचालिका पोर्णिमा उपळावीकर यांनी काम पाहिले. तसेच शाहरुख कुरणे, अमेय पाटील व पूजा धनवडे यांनी पंच म्हणून काम करत स्पर्धा सुरळीत पार पाडण्यात मोलाचे योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या