प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : सांगली जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि. १० मे २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे जिल्हा वरिष्ठ अजिंक्यपद व निवड मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला जिल्हाभरातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू सामलेवाले यांच्या हस्ते मैदान पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव संजय पाटील, हिम्मत पाटील, विजयकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शासनाच्या विविध क्रीडा योजनांचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. खेळाडूंना दुखापतीसंदर्भात फिजिओथेरपी टीमकडून उपचार व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचलन राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश सिंहासने तर आभार श्री.युवराज खटके यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष माने, आदित्य लोंढे, साहिल पाटील, शिवाजी वाडकर, सिद्धी पाटील, विकास ताटे, संतोष पाटील, अंकुश कलगुटगी तसेच सांगली शहरातील खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील प्रमुख निकाल :
१०० मी. धावणे :
१) आर्यन संभाजी शेजाळ
२) निल विक्रम पवार
३) नवनाथ उमेश पाटील
२०० मी. धावणे :
१) प्रणव सुभाष खोत
२) महेंद्र राजू मुळे
३) श्रेयश शरद पवार
५००० मी. धावणे :
१) चैत्य मुंकुंद रूपनर
२) अनिकेत हरिया देशमुख
३) करण रमेश सदवटे
लांब उडी :
१) किरण राहाजी गुजले
२) सिद्धार्थ किसन गाडे
३) अस्मत नियाज सावन
गोळाफेक :
१) प्रफुल्ल जालिंदर थोरात
२) विद्यावंती साहिरा जांबरे
३) हर्षवर्धन राजेंद्रकुमार वाडवे
महिला १०० मी. धावणे :
१) यशश्री श्यामसिंह राजपूत
२) प्रतीक्षा संतोष सती
३) पूजा आनंद वाघमोडे
महिला १५०० मी. धावणे :
१) प्रांजली नामदेव मंडले
२) सई सागर चोंगुले
३) श्रावणी विनायक शिंदे
महिला २०० मी. धावणे :
१) यशश्री श्यामसिंह राजपूत
२) खुशबू सिद्धार्थ गाडे
३) प्रतीक्षा संतोष संती
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या