सावळज दि. 6 : डोंगरसोनी (ता. तासगाव) : येथील शेतकरी चंदू राजमाने यांच्या डोंगरसोनी रोडवरील डुबे नामक शेतामध्ये दोन वर्षापूर्वी जेसीबीच्या साह्याने खुदाई करत असताना अनपेक्षितपणे सापडलेली श्री गणेशाची मूर्ती ही राजमाने कुटुंबांसाठी आणि गावासाठी एक पवित्र आणि भावनिक घटना ठरली. त्या दिवशीपासून राजमाने कुटुंब आणि ग्रामस्थांच्या मनात श्रद्धेची एक नवीन ज्योत पेटली. चंद्रकांत यांनी भक्तिभावाने या मूर्तीची विधिवत केवळ स्थापनाच नव्हे तर अत्यंत सुंदर मंदिरही उभारले आहे. आज या पवित्र घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली. मंगळवारी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने मंदिर परिसरात असंख्य भाविकांना प्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े. अभिषेक, पूजन आणि आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला.
केवळ दोन वर्षांत गणेश मंदिर गावाच्या श्रद्धेचे केंद्र बनले असून, ग्रामस्थांच्या एकतेचे प्रतीक ठरले आहे. हा वर्धापन दिन भक्ती, एकोप्याची जाणीव आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा सोहळा म्हणून साजरा होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या