सांगली प्रतिनिधी : आदर्श राज्यकर्ते, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि थोर समाजसुधारक लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय येथे त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली. समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी दिलेले योगदान अफाट आहे. त्यांनी दिलेली समतेची शिकवण आणि राबवलेली लोककल्याणकारी धोरणे आजही समाजासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. महाराजांच्या विचारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी सर्व उपस्थितांनी केला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर:
या अभिवादन कार्यक्रमाला नगरसेविका योगिताताई राठोड, मंडलध्यक्ष रविंद्र वादवणे, अमित देसाई, राजू जाधव, अमर पडळकर, किरण कपाले, प्रशांत राठोड, राजू पठाण, गौस पठाण, भालचंद्र बक्षी, श्रीधर जाधव, आबा जाधव, अक्षय काळे, बापू सोनावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या