प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मुंबई : राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वाचा बदल करण्यात येत असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीचा नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. यापूर्वी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता सहावीच्या अभ्यासक्रमालाही राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यस्तरीय सुकरण समितीने हिरवा कंदील दिला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्री भुसे यांनी सांगितले की, येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात दुसरी, तिसरी, चौथीबरोबरच सहावीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या निष्पत्तीवर आधारित पद्धतीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक समज वाढविणे, कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणे आणि शिक्षण अधिक परिणामकारक बनविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या