तासगाव :तासगाव–कवठेमहांकाळ चें आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजर्डे येथील बौद्ध विहारात आर.आर.पाटील एज्युकेशन ट्रस्ट,मुंबईच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात आला.पाचवी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या एकूण ५९ विद्यार्थ्यांना रोख रकमेचे धनादेश देऊन शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत सीताराम रणखांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहन नाना पाटील, माजी सभापती कमलताई दिनकरदादा पाटील,सरपंच संध्याराणी मंडले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील यांनी सांगितले की, “बौद्ध तसेच वंचित घटकांतील प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावा,या उदात्त हेतूने ट्रस्ट कार्यरत आहे.” त्यांनी ट्रस्टचे कार्य आणि डॉ.रणखांबे यांच्या योगदानाचे कौतुक करत भविष्यात प्रत्येक गावात असे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील प्रथम महिला आय.आर.एस. (इंडियन कस्टम) अधिकारी सुधा श्रीकांत रणखांबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याचबरोबर ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मानकरी साहित्यिक नवनाथ रणखांबे आणि राष्ट्रपती पदक विजेते ‘रुबाब’ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) सांगली जिल्हाध्यक्ष सुशांत पाटील,प्रदेश सचिव ताज्जूद्दीन तांबोळी, तालुका अध्यक्ष विश्वासतात्या पाटील,संगम पाटील, उमेश मोहिते,शिवनेरी केसरी विजेते पै.लक्ष्मण मंडले,कापूर अग्रणीचे संस्थापक विनायक मोहिते, लक्ष्मी इंडस्ट्रीचे मालक संजय पाटील,कुमार जाधव,प्रकाश मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर, ट्रस्ट पदाधिकारी,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभाष बबन रणखांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनाथ आनंदा रणखांबे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या