प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : पृथ्वीराज (भैय्या) पवार विकास मंच आणि अभिजित फाउंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत आराध्य शरद पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
या यशाबद्दल आयोजित बक्षीस वितरण समारंभात आराध्यचा प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम आणि लेखन साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. रणजित सर उपस्थित होते. तसेच पृथ्वीराज (भैय्या) पवार, पत्रकार अजित सर, गजानन सर, अभिजित फाउंडेशनचे मालगत्ते सर व इनामदार सर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षराची सवय जोपासून नियमित लेखनाचा सराव करावा, असे आवाहन केले. हस्ताक्षर ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असून अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आराध्य शरद पाटीलच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या