सांगली प्रतिनिधी : सांगली मनपा च्या आगामी स्वीकृत नगरसेवक पदासाठी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामचंद्र झेंडे इच्छुक आहेत तशी मागणी मा.आमदार सुरेश भाऊ खाडे व जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.या नगरसेवक पदासाठी सध्या प्रत्येक पक्षाकडे मोठी भाऊगर्दी आहे.मनपा निवडणुकीतील स्थानिक नगरसेवकांच्या बरोबरीने आपली वर्णी लागावी म्हणून बऱ्याच इच्छुकांची धावाधाव सुरू आहे.पक्षाचे काम करणारे,निष्ठावंत कार्यकर्ते, प्रचाराच्या धामधुमीत नेत्यांकडून शब्द घेवून कामाला लागलेली अनेक मंडळी आता सद्या चांगलेच सक्रिय झालेली दिसत आहेत.त्या त्या पक्षा च्या धोरणाप्रमाणे च या नियुक्त्या होणार आहेत. नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामचंद्र झेंडे हे देखील इच्छुक असून भाजप पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. याशिवाय त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्य व योगदान याची दखल पक्षाने घ्यावी.असे त्यांनी पत्रात नमूद करत त्यांनी तसे पत्र आमदार सुरेश भाऊ खाडे तसेच श्री.ढंग यांच्याकडे सुपूर्त केले आहे.नाभिक समाज बांधव ही ठामपणे श्री. झेंडे यांच्या पाठीशी उभे आहेत. यामुळे ही निवडणूक आता आणखीन रंगतदार झाली आहे.
सांगली मनपासाठी स्वीकृत सदस्य पदासाठी सुरेश झेंडे इच्छुक
By -
एप्रिल ०९, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या