प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. ११:गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या होमिओपॅथी मेडिकल कॉलेज मध्ये सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा करण्यात आला. होमिओपॅथी औषधोपचारामुळे क्लिष्ट व गुंतागुंतीचे रोग बरे होतात. आज जगातील १०० देशामध्ये होमिओपॅथीने रुग्णावर उपचार केले जातात. या उपचार पध्दतीचा प्रचार व प्रसार करुन रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी जनतेत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी गुलाबराव पाटील होमिओपॅथी काॅलेज तर्फे प्रयत्न केले प्रतिष्ठा जातात.प्रारंभी होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवी डॉक्टर उपस्थित होते. त्यांनी होमिओपॅथी औषधोपचार पध्दतीवर विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त अँड वीरेंद्रसिंह पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉ सतीश पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ प्रताप भोसले , डॉ राजेंद्र मेथे, डॉ बिडीवाले, सेमिनार कमिटी प्रमुख डॉ अंजली कुलकर्णी , मेंबर डॉ नारायणी वालावलकर, सर्व विभागाचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या