कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील प्रवासी सुविधांमध्ये भर घालणाऱ्या चार नव्या बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. १७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव आणि जयसिंगपूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार असून, मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमास मा. ना. श्री. हसन मुश्रीफ व मा. ना. श्रीमती माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यास विविध खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नव्या बसस्थानकांमुळे संबंधित परिसरातील प्रवाशांना आधुनिक सुविधा, सुरक्षित प्रतीक्षागृह, अधिक सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था आणि प्रवासाचा अधिक चांगला अनुभव मिळणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
कार्यक्रमाचे वेळापत्रक असे :
वाठार बसस्थानक – दुपारी १२.२० वा.
पेठवडगाव बसस्थानक – दुपारी १.४० वा.
जयसिंगपूर बसस्थानक – दुपारी २.२० वा.
छत्रपती संभाजीनगर बसस्थानक, कोल्हापूर – दुपारी ४.०० वा.
या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या