तासगाव : तासगाव हायस्कूलच्या 1975/76 सालच्या दहावी बॅचमधील वर्गमित्र-मैत्रिणींचा तब्बल 50 वर्षांनंतर प्रथमच भव्य गेट-टुगेदर मेळावा उत्साहात पार पडला. 28 मार्च 2026 रोजी शनिवारी चंपाबेन वाडीलाल ज्ञान मंदिर, तासगाव येथे हा संस्मरणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या मेळाव्याची सुरुवात 15 जानेवारी 2025 रोजी आर. डब्ल्यू. काळे सर यांच्या कन्या व मैत्रीण संजीवनी काळे यांनी ग्रुप स्थापन करून केली. या उपक्रमात रवि पाटील आणि संजीवनी काळे यांनी ॲडमिन म्हणून पुढाकार घेतला. एकूण 56 माजी विद्यार्थ्यांनी या गटात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला अविनाश देशमुख सर, किणीकर सर, तसेच संतोष शंकर जोशी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संतोष जोशी सरांच्या उपस्थितीत दहावी ‘अ’ च्या वर्गातच हा कार्यक्रम पार पडला, ज्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमाची प्रस्तावना रवि पाटील यांनी केली, तर विजया चव्हाण यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद चिंतामणी जोग आणि सहाय्यक शिक्षक नितीन अरविंद जोशी यांची उपस्थिती विशेष ठरली. तसेच सामाजिक कार्यकर्ते निसार हाजी यासीन मुल्ला, मिलिंद विश्वनाथ सुतार आणि पत्रकारांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यात सलीम म्हेतर, सुभाष सोनी, स्मिता जोशी, गीता परसुरे, शशीकांत पाटील, उल्का पाटील, ज्ञानेश्वर मुळे, संपतराव पवार, माणिक पाटील, सुषमा पाटील, प्रदीप मंकणी आदींनी मनोगत व्यक्त केले. हरिभाऊ कुलकर्णी यांनी सादर केलेल्या बासरी वादनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
या प्रसंगी सलीम म्हेतर यांच्या हस्ते सर्वांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित फोटो शाळेला भेट म्हणून दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी ॲडमिन संजीवनी राजाराम काळे यांनी सर्वांचे आभार मानले. 50 वर्षांनंतर झालेल्या या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळत, स्नेहबंध अधिक दृढ झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या