सांगली दि. १५:जगभर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी होत असताना सांगलीत ८० फूटी दत्तनगर येथे गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजने पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रचनात्मक व लोकोपयोगी उपक्रमातून संविधान निर्मात्याला अभिवादन केले संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबीन पातळी व अन्य आजाराने त्रस्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीराचा ४० रुग्णांनी लाभ घेतला.
यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, उपाध्यक्ष प्रशांत होवाळे, सचिवसुधाकर कांबळे ,खजिनदार प्रतिक सनदी यांचे सहकार्य लाभले. पुरोगामी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक लोंढे,दिलीप कांबळे,अजय लोंढे, कमलाकर सर, पांडुरंग कांबळे सर, सिद्धार्थ साबळे,राहुल देवकाते, संतोष भोसले, धनराज राऊत,गुरु मिस्त्री,विजय कांबळे, नवज्योत पाटील,कुणाल कोळेकर,राजू जोशी, कपिल पुजारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला . यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.प्रताप भोसले ,डॉ. राजेंद्र मेथे ,डॉ. वैशाली यादव इतर हॉस्पिटल स्टाफ आणि इंटर्न विद्यार्थी उपस्थितीत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या