प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली - विवेकानंद सोसायटी कुपवाड रोड येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ३६ सांगलीचे सालाबाद प्रमाणे यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. देशभक्तीपर गीते, लावणी, समाज प्रबोधनपर नाटक, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत विविध राज्यातील गीते, हिंदी मराठी रिमिक्स गाणी, कथा सादर केल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत ही बाब कौतुकाची आहे. शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊ, शाळेसाठी बस सुविधा लवकरच उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी दिली. दरम्यान नगरसेवक विष्णू माने, नगरसेविका मीनाक्षीताई पाटील, नगरसेविका योगिताताई राठोड, यांनी शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठी सदाशिव पाटील, आशुतोष धोत्रे, प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर, विशाल भोंडवे, अशोक नागरगोजे, रेश्मा ढेरे, संगीता फडतरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिता गोरड, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष हर्षवर्धन घोदे आदीसह पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाहीन सनदी, अक्षता रेड्डी, मोनाली पवार, कविता चौगुले, सुमन फडतरे, रोहिणी रेनके यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शंकर ढेरे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या