प्रतिष्ठा न्यूज
बारामती : बारामतीत विमान लँड होत असताना अपघात होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
विमान लँड होत असताना अपघातात होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत विविध माध्यमांतून माहिती आली आहे.
अजित पवार हे आज बुधवारी सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा हे सभेसाठी बारामतीला येण्यासाठी निघाले होते. मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान उतरत असताना ते कोसळले.
या अपघातात अजित पवारांसह इतर काही जणांचा मृत्यू झाला. विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
महाराष्ट्राचं सहा वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अजितदादांसारख्या नेत्याच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील जनता शोकसागरात बुडाली आहे. पहाटे पासून जनसेवेसाठी तत्पर नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी झटत राहणारे नेते म्हणून अजित पवार हे राज्यभरात लोकप्रिय होते. अशा नेत्याच्या अकाली जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
बारामतीतून फुललेल्या अजितदादांच्या नेतृत्वाने पुढे राज्यभर आपलं गारूड तयार केलं. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा बहुमान त्यांना मिळाला. अजितदादांनी या पदाच्या माध्यमातून सतत कार्यरत राहत आपली छाप उमटवली. मात्र ज्या बारामतीतून हे नेतृत्व उभं राहिलं त्याच बारामतीत आज अजित पवार यांच्यावर काळाने घाला घातला असून त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.
घटनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
अपघात : बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला (Learjet 45) अपघात झाला.
वेळ: ही दुर्घटना बुधवारी सकाळी साधारण ८:५० च्या सुमारास घडली.
जिवीतहानी: विमानात अजित पवार यांच्यासह एकूण सहा व्यक्ती होत्या आणि या अपघातात कोणाचाही बचाव झाला नाही.
राजकीय शोक : त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे.
श्रद्धांजली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि इतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या