प्रतिष्ठा न्यूज
येळावी प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील तुरची गावचे सुपुत्र तसेच येळावी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप देवकुळे हे तासगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमधील एकमेव उच्चशिक्षित व सर्वाधिक पदव्या प्राप्त उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत. विविध शैक्षणिक पात्रता, सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची निवडणूक लढत लक्षवेधी ठरत आहे.
कुलदीप देवकुळे यांनी मानवी हक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, डिप्लोमा इन योग शिक्षक, डिप्लोमा इन नाट्यशास्त्र तसेच डिप्लोमा इन गांधी विचार दर्शन असे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. याशिवाय त्यांनी बी.ए. (राज्यशास्त्र) व बी.ए. (पत्रकारिता) या पदव्या संपादन केल्या असून, एम.ए. (लोकप्रशासन) व एम.ए. (मराठी) या पदव्युत्तर पदव्या देखील त्यांनी मिळवल्या आहेत.
सध्या ते निसर्गरंग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मीडिया परिषद, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सांगलीचे संचालक, तसेच भयमुक्त–नशामुक्त अभियान, सांगली जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय विजयदीप सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, तुरची (ता. तासगाव) या सामाजिक उपक्रमाचे ते संस्थापक आहेत.
यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग, शांतिनिकेतन, सांगली येथे समन्वयक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती, सांगली जिल्हा येथे त्यांनी प्रमुख निमंत्रक व सचिव म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.
याशिवाय ते सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, नाट्य, चित्रपट, कलाकार व तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगलीचे सदस्य, मासिक ‘भारतीय माहिती अधिकार’चे प्रमुख मार्गदर्शक तसेच वृत्तवाहिनी पत्रकार संघटना, सांगली जिल्ह्याचे प्रवक्ता म्हणूनही कार्यरत आहेत.
सामाजिक व पर्यावरणीय चळवळीतही त्यांचे कार्य उल्लेखनीय असून, महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या ‘निसर्गरंग साहित्य संमेलनाचे सलग पाच वर्षे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. तसेच “निसर्गराया भेटूया… चला, विठ्ठल पेरूया…” या ब्रीदवाक्याखाली सांगली ते पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी निमित्त सलग नऊ वर्षे वृक्षारोपण व पर्यावरण सायकल वारी आयोजित करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.
शिक्षण, समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, नाट्य व पर्यावरण या सर्वच क्षेत्रातील अनुभवामुळे कुलदीप देवकुळे हे येळावी जिल्हा परिषद गटातील एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले व जनहित जपणारे उमेदवार म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या उमेदवारीकडे मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या