प्रतिष्ठा न्यूज
धामणी : श्री विशाल विश्वकर्मा लोहार सुतार समाज संस्था सांगली यांच्या वतीने धामणी रोड येथे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली यावेळी सुरुवातीस हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री नितीन शिंदे व कवठे सप्तर्षी ग्रामपंचायत सदस्य श्री शिवाजी पाटील यांच्या हस्ते श्री विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी बोलताना माजी आमदार श्री नितीन शिंदे म्हणाले कि लोहार- सुतार हा समाज अत्यंत कमी लोक संख्या असलेला समाज आहे, समाजात छोटे-मोठे कारागीर, आहेत या समाजात छोटे-मोठे कार्यक्रम लग्न, बारसे, मुंज, श्री विश्वकर्मा जयंती, इत्यादी कार्यक्रम घेण्यासाठी लोहार - सुतार समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्याची गरज आहे, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले,व समाजास श्री विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या... उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ईश्वर सुतार, आधारस्तंभ शीलाताई आगाशे, खजिनदार अमोल सुतार, संचालक चंद्रकांत मुचंडीकर, कोल्हापूर अध्यक्ष कृष्णांत लोहार, कोल्हापूर उपाध्यक्ष विजय सुतार, व हिंदू एकता आंदोलनाचे गाव भाग विभाग अध्यक्ष श्री गजानन माने व लोहार - सुतार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या