प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:विसापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून जि.प.उमेदवार सुनिल भाऊ पाटील आणि पं.स.उमेदवार सुनील बापू जाधव यांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे.दोन्ही उमेदवारांनी कार्यकर्त्यांचा भक्कम फौजफाटा घेऊन घर टू घर संपर्क अभियान प्रभावीपणे राबवले आहे. विकास,शेतकरी हित,युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण व स्थानिक पातळीवरील रखडलेल्या कामांवर ठोस भूमिका मांडत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धोरणांना मोठा प्रतिसाद मिळत असून विरोधकांची धावपळ वाढली आहे. “काम करणाऱ्यालाच संधी” हा संदेश देत जास्तीत जास्त संख्येने मतदान करून विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांकडून करण्यात येत आहे.प्रचाराच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादीची ताकद दिसून येत असून विसापूर गटात सत्ता परिवर्तनाची लाट स्पष्टपणे जाणवत आहे,असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या