प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तालुक्यातील पांचाळ समाज सेवाभावी संस्था यांच्या वतीने श्री प्रभु विश्वकर्मा प्रकट दिन सोहळा शनिवार,दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.या सोहळ्यास पांचाळ समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता ध्वजारोहण, दीपप्रज्वलन तसेच प्रभु श्री विश्वकर्मा व कालिकादेवी प्रतिमापूजनाने होणार आहे.सकाळी ९ ते ११ वाजता भजन कार्यक्रम,तर ११ ते १२ वाजता प्रभु श्री विश्वकर्मा व कालिकामाता यांची माहितीपर प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.दुपारी १२ वाजता श्री प्रभु विश्वकर्मा प्रकट दिन सोहळा,त्यानंतर १२.३० ते १ वाजता महिला हळदी-कुंकू समारंभ होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
हा सोहळा समाजाचे ज्येष्ठ बांधव गोपाळ जनार्दन सुतार यांच्या निवासस्थानी,माळी गल्ली,पूजा फिटनेस सेंटरजवळ,तासगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमासाठी श्री विश्वकर्मा पांचाळ समाज सेवाभावी संस्था,श्री कालिकादेवी बहुउद्देशीय महिला मंडळ व श्री कालिकादेवी स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.या धार्मिक व सामाजिक सोहळ्यास पांचाळ समाजातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आयोजकांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या