प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तासगाव तालुका संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘गृह संपर्क’ अभियानाचा तासगावचे आराध्य दैवत श्री गणरायाला स्मरून आणि त्यांना गृह संपर्क अभियानाचे पत्रक अर्पण करून शुभारंभ करण्यात आला.या अभियानाचा प्रारंभ तासगावचे ज्येष्ठ स्वयंसेवक पांडुरंग माळी अण्णा यांच्या हस्ते करण्यात आला.हे अभियान २१ फेब्रुवारीपर्यंत राबविले जाणार असून,तासगाव तालुक्यातील ५९ गावांमध्ये गृह संपर्क अभियान होणार आहे.संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राबविण्यात येणारे हे अभियान म्हणजे जनजागृतीचा महायज्ञ असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.प्रत्येक घरापर्यंत संघाचा विचार पोहोचल्यास राष्ट्र मजबूत होईल,समाज एकसंध बनेल आणि युवा पिढीला योग्य दिशा मिळेल,असा विश्वास स्वयंसेवकांनी व्यक्त केला.या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघाचे विचार,कार्य, राष्ट्रभक्तीची भावना तसेच संघाच्या शंभर वर्षांच्या कार्याची माहिती पोहोचविण्यात येणार आहे.गृह संपर्क दरम्यान नागरिकांना संघशताब्दी पुस्तक,माहितीपत्रक तसेच भारत मातेची प्रतिमा देण्यात येणार आहे.
या प्रसंगी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या