प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित नगरसेवकांची मा. जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. नगरसेवक संदीप सुरेश आवटी यांची भारतीय जनता पार्टी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका गटनेता म्हणुन एक मतांनी निवड करण्यात आली. सदरील बैठकीस नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली आ.डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, आ. सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा. मकरंद (भाऊ) देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जेष्ठनेते दिपकबाबा शिंदे, निताताई केळकर, जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार. नितिन शिंदे, पृथ्वीराज (भैय्या) पवार, पृथ्वीराजबाबा पाटील, रावसाहेब पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई खाडे, मा. सुरेशबापू आवटी, पै. दिलीप सुर्यवंशी, पांडुरंग कोरे, विशाल पवार, विश्वजीत पाटील, युवामोर्चा शांतीनाथ कर्वे यांच्या उपस्थितीत सदरील बैठकीमध्ये प्रभाग क्र. ०३ ड मधील नगरसेवक संदीप सुरेश आवटी यांची भारतीय जनता पार्टी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका गटनेता म्हणुन एक मतांनी निवड करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या