विजयपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्रामीण जनतेला तातडीने मदत मिळावी, यासाठी दुष्काळग्रस्त तालुके व गावांची घोषणा करुन पाणी, चाराची व्यवस्था तातडीने करावे अशी मागणी विजयपूर शहर जेडीएसच्या वतीने करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत एस. किणगी यांच्या नेतृत्वाखाली जेडीएस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्तांमार्फत कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना निवेदन सादर केले.
दुष्काळग्रस्त भागात तातडीने निवारणाची कामे सुरू करून नागरिक व जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करावी. तलावांमध्ये पाणी भरण्याची योजना राबवावी, तसेच पिकांच्या नुकसानीचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. अल्प कालावधीतील पिकांच्या लागवडीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी जेडीएस जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन यंडिगेरी यांच्यासह पंचप्पा कलबुर्गी, एस.एस. खाद्रीइनामदार, वीरेंद्र पाटील हळसंगी, एस.व्ही. पाटील, विश्वनाथ कोरी, मरेप्पा गिरणवड्डर, प्रदीप नायकोडी, संजीव हिरेमठ, जाफर कलादगी, डॉ. मल्लिकार्जुन सिरूर, मनोज बिरादार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या