संग्रामपूर प्रतीनीधी : यंदा जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तीनही तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाची गंभीर दखल घेत मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पाहणी केली होती.
त्यानंतर हे तीनही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावेत, यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे आता या भागातील शेतकऱ्यांना शासकीय मदत, पीक विमा व इतर सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी वर्गातून आमदार डॉ. संजय कुटे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त होत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या