प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेने अहवाल सालात २९ लाख रुपयांचा नफा मिळविला असून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन रामचंद्र माळी यांनी दिली.सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन रामचंद्र माळी होते.यावेळी व्हा.चेअरमन संभाजी सूर्यवंशी,ज्येष्ठ सभासद तसेच आजी-माजी संचालक उपस्थित होते. प्रारंभी संचालक राहुल कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यानंतर चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.संस्थेचे संस्थापक चेअरमन कै.अरुण उर्फ बाळासाहेब (दादा) यशवंत कुलकर्णी तसेच संचालक राजेंद्र तात्या मानकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून दोन मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.संस्थेचे सचिव रामचंद्र लांडगे यांनी अहवाल व मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सभेत नफा-तोटा पत्रकासह नफा वाटप व इतर विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.ऐनवेळच्या विषयांमध्ये मंगळूरकर, शैलेश भंडारे, थोरबोले काका व श्रेणिक पवार यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले.त्यांना चेअरमन रामचंद्र माळी यांनी समर्पक उत्तरे दिली.यावेळी ७१ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा तसेच संस्थेच्या हितासाठी पिग्मी संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सभेस संचालक मिलिंद बोडके, राहुल कांबळे, चंद्रकांत गेंड, अलताफ जमादार, मारुती गुरव, हरिभाऊ पवार, राजेंद्र चव्हाण, संचालिका अपर्णा कदम, वंदना पवार, सचिव रामचंद्र लांडगे, राजेंद्र वादवणे, सुनील हिंगमिरे, माळी मॅडम, जाधव मॅडम, निलेश गायकवाड यांच्यासह सभासद उपस्थित होते.सभासदांसाठी संस्थेच्या वतीने चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. माजी चेअरमन तथा संचालक मिलिंद आबा बोडके यांनी आभार मानले. त्यानंतर सभेचे कामकाज पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या