प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तासगाव येथील श्री गणपती पंचायातन देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री गणपती मंदिरात शेकडो महिलांच्या उपस्थितीत सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शहरातील महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिलांनी एकत्रितपणे अथर्वशीर्षाचे पठण केल्याने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
गणपती अथर्वशीर्ष पठणामुळे वातावरणात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले. गणरायाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. श्री गणपती पंचायातन देवस्थान ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक पठणामुळे महिला भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या