सावळज : दि.19 : सावळज (तासगाव) : येथील सुपुत्र सुभेदार संदीप गजानन वांडरे (वय 43) यांनी सैन्य दलात सलग 24 वर्षे निष्ठा व धैर्याने देशसेवा केली त्यांच्या पार्थिवावर सावळज येथे शुक्रवारी दुपारी अश्रूपूर्ण नयनांनी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.फरीदाकोट (पंजाब) येथे लष्करी अभियांत्रिकी सेवेत गॅरीसन इंजिनिअर म्हणून सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने संपूर्ण सावळज गावावर शोककळा पसरली सुभेदार वांडरे यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी सावळज येथे दाखल झाले.
त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव ठेवल्यानंतर अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती या प्रसंगी शासकीय इतमामात विशेष मानवंदना देण्यात आली यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, पोलीस निरीक्षक विशाल टकले, विविध आजी माजी सैनिक संघटना, सांगली जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच सावळज भागातील लोकप्रतिनिधी तसेच भारतीय सैन्यदल तुकडी यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर वांडरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या