संग्रामपूर प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, या नियुक्त्यांमध्ये संग्रामपूर तालुक्याने ठसा उमटवला आहे. तालुक्यातील आठ निष्ठावंत कार्यकर्त्यांची काँग्रेसच्या जिल्हा तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध महत्त्वाच्या पदांवर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय, टिळक भवन, दादर, मुंबई येथून जावक क्र. ४६०/२०२६, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांना अधिकृत पत्राद्वारे जिल्हा कार्यकारिणीतील नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या राज्य कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली आहे.
या दोन्ही कार्यकारिण्यांमध्ये संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बापू देशमुख, संतोष राजनकार आणि अताउल्ला पठाण सर, तर जिल्हा सरचिटणीसपदी राजेश्वर बापू देशमुख आणि संजय ढगे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा सचिवपदी प्रकाश साबे, सोशल मीडिया प्रमुखपदी अमोल घोडेस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सचिवपदी राजेंद्र वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्हा व प्रदेश पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या नियुक्त्यांमुळे संग्रामपूर तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या