सांगली प्रतिनिधी : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., सांगलीच्या सन २०२६-२०२७ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ गुरुवारी खासदार तथा कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
गळीत हंगामाच्या प्रारंभाची पूर्वतयारी म्हणून आयोजित या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन बी. डी. पाटील, कारखाना संचालक हर्षवर्धन पाटील, अमित पाटील, खुजट, शिवाजी कदम, उमेश मोहिते, अंकुश पाटील, विशाल चंदुरकर, संजय पाटील, तानाजी पाटील, नितीन खोत यांच्यासह कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एम. व्ही. पाटील, कार्यकारी संचालक संजय पाटील, डिस्टलरी मॅनेजर गायकवाड उपस्थित होते.
यावेळी कामगार प्रतिनिधी प्रदीप शिंदे, कामगार युनियनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दत्त इंडिया प्रा. लि.चे जनरल मॅनेजर शरद मोरे (बापू), फायनान्स मॅनेजर अमोल शिंदे, व्हाईस प्रेसिडेंट भरत तावरे, डीजीएम नकाते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास कारखान्याचे कामगार-कर्मचारी, शेतकरी, सभासद, ऊसतोडणी व वाहतूकदार तसेच शेतकरी संघटनेचे नेते यांचीही उपस्थिती होती. बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यामुळे आगामी गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून कारखाना प्रशासनाकडून हंगामासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे.
सन २०२६-२०२७ च्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासन, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद तसेच तोडणी-वाहतूक यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवून हंगाम सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या