सांगली प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बँकेचे विद्यमान संचालक आणि भाजपचे नेते पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. क 3 पतसंस्था, नागरी बँका आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या पतपेढी या गटातून ते लढणार आहेत. गेल्या निवडणुकीत याच गटातून त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते मिळवून विजय मिळवला होता.
पतसंस्था गटाचे प्रतिनिधी म्हणून गेल्या पाच वर्षात त्यांनी दिलेली प्रमुख आश्वासने पूर्ण केली आहेत. पतसंस्थांच्या ठेवींवरील व्याजदर वाढ, उत्तम पतसंस्थांना सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्या नावाचा पुरस्कार या दोन प्रमुख गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे पतसंस्था गटात पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत समाधानाचे वातावरण आहे. यावेळी उत्तम कामगिरीसाठी, सहकाराच्या सकारात्मक दिशेने विकासासाठी आपण मैदानात उतरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए. डी. पाटील, एन एम हुल्याळकर, बिपिन कदम, अजय देशमुख, सनी धोतरे, महावीर पाटील इनामधामणी, महावीर पाटील नांद्रे, सुहास पाटील, प्रशांत देशमुख, विजय बसरगी, अरविंद पाटील, अरविंद जैनापुरे, अय्युब निशाणदर, अशोकसिंग रजपूत, डॉ. प्रताप भोसले, अरुण गवंडी, देशभूषण पाटील, आशिष चौधरी, सुनील शिंदे, रमेश जाधव, संतोष भोसले, रामभाऊ पाटील उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या