प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तासगाव (अतिदक्षता विभाग व क्रिटिकल केअर युनिट) च्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध आरोग्यविषयक उपक्रम, मोफत शिबिर आणि जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कैलास सेंटर, विटा रोड, तासगाव (जि. सांगली) येथे होणार आहे.
*विविध आरोग्य उपक्रम व उपक्रमांचा पंधरवडा*
वर्धापन दिनाचे औचित्य साधून खालील सेवा व उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत:
मोफत वयोवंदना व आयुष्यमान भारत कार्ड काढणे मोहीम (पंधरवडा)
मोफत डोळे तपासणी (पंधरवडा)
एकदिवसीय मोफत सर्वरोग निदान व उपचार मार्गदर्शन शिबिर
जाहीर व्याख्यान
वर्धापन दिनानिमित्त विशेष जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये:
वक्ते: डॉ. अजित पाटील (सांगली)
विषय: "चला मित्रहो... आरोग्यावर बोलू काही...!"
प्रमुख अतिथी व मानकरी
उद्घाटक व सत्कारमूर्ती:
डॉ. दिलीप माने (सहसंचालक, आरोग्य खरेदी मुंबई / आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर)
प्रमुख पाहुणे:
सौ. विजयाताई पाटील (नगराध्यक्ष, तासगाव नगर परिषद)
डॉ. विक्रमसिंह कदम (सिव्हिल सर्जन, सांगली)
लाईफकेअर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी:
डॉ. शब्बीर मुलाणी (चिंचणी)
डॉ. शहाजी शेळके (तासगाव)
प्रमुख उपस्थिती:
डॉ. बिभीषण सारंगकर (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय तासगाव)
डॉ. विशाल करांडे (तालुका आरोग्य अधिकारी तासगाव)
डॉ. सुभाष सांगरे (जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जन आरोग्य योजना)
कार्यक्रम माहिती:
दिनांक: २४ सप्टेंबर २०२६
वेळ: दुपारी १२:३० वाजता
स्थळ: लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कैलास सेंटर, विटा रोड, तासगाव (जि. सांगली)
संपर्क क्रमांक: 9423469955, 7972356970, 9422514546
स्वागतात्सुक:डॉ.विनय पतकी (कुटुंबप्रमुख), डॉ.ज्ञानेश्वर शिवणकर (मॅनेजिंग डायरेक्टर), डॉ. विजय माने-पाटील, डॉ. जहीर नदाफ, डॉ. धनाजी जगताप, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. सुहास कदम, श्री. प्रताप घाटगे, डॉ. सचिन वाघ, डॉ. शिवराज भोसले व सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, लाईफकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तासगाव.
परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य उपक्रमांचा व व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या