सावळज प्रतिनिधी : 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा खुजगाव मध्ये माजी सैनिक श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. तसेच स्वातंत्र्य दिना विषयी भाषणे केली. संगीत कवायत सादर केली. यावेळी वसंत फार्णे फाउंडेशन यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळेतील लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच मोफत सायकली देण्यात आल्या. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री .कुणाल फार्णे, सचिव श्री .प्रकाश पाटील, संस्थापक श्री. जालिंदर फार्णे, संचालिका सौ.प्राची फार्णे उपस्थित होते. श्री. सुभाष पाटील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे दिली. श्री. नारायण देशमुख सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके दिली. श्री. विवेक तोडकर यांनी अंगणवाडी ते हायस्कूलच्या आदर्श विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.अनिल जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी फाउंडेशन तर्फे सौ. प्राची फार्णे, श्री. गजानन कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेस यापुढेही सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच श्री. नंदकुमार पाटील यांनी वसंत फार्णे फाउंडेशनचे आभार मानले. शाळेतील गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले. श्री.कोबीनवार सर यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास सरपंच श्री नंदकुमार पाटील आबा, उपसरपंच सौ. तृप्ती नामदेव माने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नामदेव माने भाऊ, उपाध्यक्ष श्री. मारुती तोडकर व सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन श्री. रघुनाथ देशमुख व्हॉइस चेअरमन श्री. तानाजी पाटील, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, पालक ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या