गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व संस्कृती विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गगनबावडा आगारातील एसटी चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, प्रवासी तसेच गगनबावडा पोलीस ठाण्यातील पोलिसांना राख्या बांधून त्यांचे आभार मानले.
आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी सांगितले. या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश देसाई व सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी आगार प्रमुख सुरेश शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस कर्मचारी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून विद्यार्थिनींचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या